जबलपूर : मध्यप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्ष सतर्क झाले आहे. काँग्रेसने मंदसौर येथे किसान सभेचे आयोजन केले आहे तर त्यांचे समर्थक आणि गुजरातचे पाटीदार नेता हार्दीक पटेल यांनी जबलपुरात एक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसचे समर्थन करण्यासाठी मैदानात उतरलेले हार्दीक पटेल यांच्यावर जबलपुरच्या जनतेने त्यांच्यावर अंडे तसेच दगड फेकले.
जबलपुर येथे सभेला मार्गदर्शन करण्यासाठी हार्दीक पटेल यांचा ताफा निघाला असता तो जेव्हा जबलपुरच्या रस्तावरून जाऊ लागला तेव्हा तिथे लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि त्यांच्यावर अंडे तसेच दगड फेकले. लोक असे करताना बघताच त्यांच्यासोबत असलेल्या काँग्रेस नेत्या पिस्तुल काढले. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यापैकी काही लोक हल्ले करणा-यांच्या मागे धावू लागले.
पोलिसांनी शांती भंग करण्याच्या आरोपाखाली सात लोकांना ताब्यात घेतले आहे. हार्दीक पटेल यांची जबलपूरच्या पनागर क्षेत्रात सभेचे आयोजन करण्यात आले होते.