Advertisement
नागपूर : भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात आज ईद साजरी केली जात आहे. मुस्लीम धर्मियांमध्ये ईद हा सण अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान ईद मुस्लीम धर्मियांचा सर्वांत मोठा सण म्हणूनही ओळखला जातो.रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी ईद-उल-फित्र साजरी केली जाते.
नागपुरात आज सर्वत्र ईद साजरी करण्यात येत आहे. शहरातील मोमीनपुरा परिसरात असलेल्या जामा मस्जिद येथे नजम अदा करण्यासाठी शेकडो मुस्लिम बांधव जमले होते. नमाज अदा झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे, जाफर नगर, ताजबाग आणि टेका नाका येथे हजारो लोक नमाज अदा करण्यासाठी जमले होते.
ईद हा आनंद व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. देशात सुसंवाद असावा, वातावरण चांगले असावे आणि लोकांनी एकमेकांना भेटून मदत करावी आणि त्यांच्या आनंदात आणि दुःखात सहभागी व्हावे, हाच ईदचा उद्देश आहे.