अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसोबत बंडखोरी करत अजित पवार यांनी शिंदे गट आणि भाजप सरकारसोबत हातमिळवणी केली. मात्र यामुळे महायुती सरकारमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचे काही खरे नाही. ते केव्हा जाईल याचा नेम नाही.
अजित पवार केव्हाही मुख्यमंत्री होतील अशी स्थिती आहे. भाजपा नेते केवळ उपयोग करून घेतात. त्यानंतर फेकून देतात, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
अमरावतीत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना सुषमा अंधारे यांनी भाजपला धारेवर धरले. भाजपाने सोमय्या यांनाही वापर करून फेकून दिले आहे. सोमय्या यांची आक्षेपार्ह चित्रफित भाजपानेच प्रसारित केल्याचा संशय आहे. ही चित्रफीत चर्चा करावी अशी नाही. मात्र आता अनेकांचे वस्त्रहरण करणाऱ्याचे वस्त्रहरण झाले, हे नक्की, असा टोलाही अंधारे यांनी लगावला. इतकेच नाही तर सुषमा अंधारे यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावरही हल्लाबोल केला.