मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी दावा केला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठे खिंडार पडणार आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे 22 आमदार आणि 9 खासदार लवकच त्यांची साथ सोडून ठाकरे गटात प्रवेश करतील. त्यांची कामे होत नसल्याने ते पक्षनेतृत्त्वावर नाराज असून ते ठाकरे गटाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही राऊत म्हणाले.
एनडीए सरकारचा एक भाग असूनही शिवसेनेला भाजपकडून सावत्र आईची वागणूक दिली जात असल्याचे शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी म्हटले. राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी 15 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना निरोप पाठवला होता की त्यांना शिंदे गटात गुदमरल्यासारखे वाटत आहे. मात्र देसाई यांनी राऊत यांनी केलेला दावा फेटाळला आहे. मी दोन दिवसांची नोटीस देत आहे. राऊत यांनी आपले म्हणणे मागे घेतले नाही तर मी कायदेशीर कारवाई करेन,असे देसाई यांनी राऊत यांना म्हटले आहे.