कन्हान : सार्वजनिक नवदुर्गा माता मंदीर पिपरी – कन्हान प्रभाग क्रं ३, येथे नवरात्र महोत्सवाची सुरूवात भव्य कावड कलश यात्रेने करून नऊ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार आहे .
बुधवार दि. १० / १० /२०१८ ला सकाळी ०९.०० वाजता बी.के.सी.पी. शाळेजवळुन पारंपारिक भव्य पायदळ कावळ – कलश यात्रा ढोल ताशा व भजन मंडळाचा गजरात, घोडागाडी मध्ये मातेचे नव रूप धारण केलेल्या सुंदर प्रतिमा भाविक मंडळीच्या जल्लोषात शोभायात्रा प्रारंभ होवुन कन्हान शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करून पिपरी गावात देवी मंदीरात दुपारी १.०० वाजता पोहचेल.
ह्या कावळ यात्रेत व्दारे आणलेल्या पावन कन्हान नदीच्या पाण्याने मंदीर व मातेचा जलअभिषेक करून घटस्थापना करून नवरात्र महोत्सवाची सुरूवात करण्यात येईल. करिता परिसरातील भाविकांनी मोठय़ा संख्येने सहभागी होऊन नवरात्री महोत्सवाचा व नवदुर्गा मातेच्या दर्शनाचा , आर्शिर्वादचा लाभ घ्यावा . असे आवाहन सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी आणि समस्त गावकरी नागरिक व माहिला मंडळी च्या वतीने करण्यात आले आहे .