नागपूर: दिवसातून अनेकदा ‘सेल्फी’ काढून फोटो एडिटिंग च्या विविध निशुल्क ‘अप्लिकेशन्स’च्या माध्यमातून त्या अधिक आकर्षक करून फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मिडियावर झळकावल्यानंतर ‘कमेंट’ची प्रतीक्षा काकुळतीने करणारे अनेक तरुण, तरुणी दिसून येतात. तरुणाई नकळतपणे ‘सेल्फिटिस’ या मानसिक आजाराकडे वाटचाल करीत आहे. सेल्फी काढताना होणारे मृत्यू तसेच ‘सोशल मिडिया’त टाकलेल्या ‘सेल्फी’वर नकारात्मक प्रतिक्रिया आल्यास नैराश्यातून आत्महत्येसारख्या घटनाही चिंतेचा विषय असून यावर नियंत्रणासाठी आघाडीचे तरुण सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी पोलिसांसह शाळा, वस्त्या व महाविद्यालयातून जनजागृतीचा वसा घेतला आहे.
‘सेल्फी’ काढल्यानंतर विविध अप्लिकेशन्सचा वापर करीत आकर्षक फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅप चॅट आदी सोशल मिडियावर टाकण्याची तरुणाईंत स्पर्धा लागली आहे. सोशल मिडियावर ‘सेल्फी’ टाकण्याचा अतिरेक होत असून अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनने ‘सेल्फिटिस’ हा एक मानसिक आजार असल्याचे म्हटले आहे. 2011 ते 2017 या काळात सेल्फी काढताना जगात 259 मृत्यू झाले असून यातील 159 मृत्यू भारतात झाल्याचा अहवाल अमेरिकेतील जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन ऍन्ड प्रायमरी केअर या संस्थेने जाहीर केला. यात तरुणींच्या तुलनेत तरुणांची संख्या अधिक आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात ‘सेल्फिटिस’चा आलेख वाढता असल्याचे दिसून येत आहे. दिवसातून दोन ते तीन सेल्फी काढणे, त्या पोस्ट केल्या नसतील तरीही हा प्रकार या आजाराच्या कक्षेत येत असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.
नागपूर जिल्ह्यातही गेल्या काही वर्षात धरणात नावेत बसून सेल्फी काढताना तरुणांचा मृत्यू झाला. त्यानंतरही तरुणाई अशा घटनांपासून बोध न घेता आणखीच सेल्फीच्या मोहात पडत आहे. पारसे सांगतात ” नो सेल्फी झोन ” बनवले गेले पाहिजे , सतत जागृती चे कार्यक्रम राबवत राहिले पाहिजे . उंच पहाड , धबधबे , दर्या – खोरे असणारी पर्यटन स्थळ , उंच इमारती , रेल्वे मार्ग , धोक्याची महा मार्गे व वाहन चालवतांना , अपघात प्रवण स्थळे इत्यादी ” सेल्फी प्रोन ” जागांवर वर विशेष प्रयत्न घ्यावे लागतील . ताकीद दिल्यावरही नो सेल्फी झोन मध्ये सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीं विरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करणे गरजेचे आहे . तरुणाईचा यापासून बचाव करण्यासाठी अजित पारसे विविध लेख , उपक्रम आणि कार्यशाळांद्वारे सोशल मीडिया च्या सृजन वापरासाठी प्रयत्नरत आहेत . विशेष म्हणजे विविध प्रकारचे वैयक्तिक फोटो, कुठे आहोत, कुठे जात आहोत, याची नियमित माहिती ‘शेअर’ करून गुन्हेगारीलाही प्रोत्साहन मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. आज सोशल मीडिया द्वारे आपण स्वतःच आपले वैयक्तिक आयुष्य जगासमोर जाहीर करतो ज्याचा गैर फायदा समाजकंटक व गुन्हेगारी वृत्तीचे व्यक्ती सहजगत्या घेऊ शकतात . अजित पारसे यांनी सोशल मिडिया वापरताना घ्यावयाची दक्षता यावर पोलिसांसोबत व इतर समाज माध्यमानसोबत समन्वय साधून युवक वर्गात मार्गदर्शन , कार्यशाळा राबवतात . शाळा, महाविद्यालय, झोपडपट्टी परिसरातही ते जनजागृती करीत आहेत. आज अनेक पालकांना त्यांच्या मुलांच्या मोबाईलचे पासवर्ड माहिती नसतात , का ? हे त्यांनी विशेष नमूद केले , ही बाब चिंतनीय असल्याचे त्यांनी नमुद केले. सोशल मीडिया ने निर्माण केलेल्या ” वर्चुअल ( आभासी ) जगात रमलेल्या तरुणाई ला वास्तविक जगात येणे निकडीचे आहे , कुटुंब व्यवस्था – वातावरण सोशल मीडिया च्या अतिरेकी वापरा मुळॆ अस्वस्थ झाली आहे .
सेल्फी वरून ट्रॉल करणे हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे ., एखाद्या व्यक्ती च्या सेल्फी वरून त्याचा अपमान , सोशल मीडिया ने कोणालाही त्याच्या सेल्फी वरून अगदी सोप्या मार्गांनी अपमानित , व्यंगकात्मक पद्धतीनी हिंवायची शक्ती प्रदान केली आहे ज्याला संपूर्ण सोशल मीडिया समुदाय उचलून धरतो , म्हणजेच एखाद्याला ” ट्रॉल ” करणे . पण या सगळ्यात त्या ट्रॉल केलेल्या व्यक्तीचा आत्मा विश्वास हा कायमचा हिरावला जाऊ शकतो , पुषकळदा त्याचे प्रत्यंतर अनेक मानसिक आघात होऊन आयुष्य उध्वस्त होणे व आत्महत्येच्या अतिरेकी निर्णयापर्यंत जाऊ शकते .
आभासी जगात वावर
‘सेल्फी’ काढल्यानंतर विविध ऍप्लिकेशन्सद्वारे त्या फोटो अधिक आकर्षक करून तरुण-तरुणींमध्ये स्वतःची वास्तविकता लपविण्याचीही वेगळीच स्पर्धा आहे. एका आभासी जगात वावरण्याची सवयच त्यांना जडत आहे. कळत नकळत आपण ‘सेल्फी सिंड्रोम’ (कंजेनाइटिस बिहेवियर डिजिज) चा आजार स्वीकारत आहोत असे भयाण चित्र अस्तित्वात आहे .
जिल्ह्यातील सेल्फीचे बळी
– 16 नोव्हेंबर 2016 रोजी शहरातील भगवानगर परिसरातील मनोज भुते या तरुणाचा रामटेक येथील गडमंदिरसोबत सेल्फी काढताना मृत्यू.
– 5 नोव्हेंबर 2017 रोजी बोर धरणात सेल्फी काढताना पंकज गायकवाड, निखिल काळबांडे या तरुणांचा मृत्यू.
विविध सेल्फी किंवा पोस्ट टाकून तरुण, तरुणींनी स्वतःवरच टिका, टिप्पणी करण्यासाठी इतरांना दालन उपलब्ध करून दिले आहे. अनेकदा या पोस्ट ‘ट्रोल’ केल्या जाते. अर्थात एकामागे एक नकारात्मक प्रतिक्रियातून तरुण, तरुणी लवकरच नैराश्यात जातात. यातून आत्महत्येसारखे विचारही मनात डोकावतात. त्यामुळेच आतापासूनच यावर आवर घालणे आवश्यक आहे.
– अजित पारसे, सोशल मिडिया विश्लेषक.