नागपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, आज शनिवार (दि.28) निवडणूक खर्च निरीक्षक सुब्रा ज्योती चक्रवर्ती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती कक्षाला भेट दिली.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ- दांदळे यांनी त्यांना माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती कक्षासंदर्भात माहिती दिली. माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून नागपूर जिल्ह्यातील सर्व 12 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार आणि प्रसिद्धी साहित्याची छपाईपूर्वी मजकूर तपासणी करणे दृकश्राव्य जाहिरातींची तपासणी करणे, पेडन्यूज संदर्भातील कार्यवाही करणे आदी कामे एमसीएमी समितीकडून केल्या जातात, त्याची माहिती दिली. यावेळी स्थानिक वृत्तवाहिन्यांवरील मजकुरावर लक्ष देण्याची सूचना श्री. चक्रवर्ती यांनी केली. श्री चक्रवर्ती यांच्याशी संपर्क करायचा असल्यास 7709741063 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करता येईल.
जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांची माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कक्षाला भेट
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज शनिवार (दि.28) जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कक्षाला भेट देत समितीच्या कामाची माहिती जाणून घेतली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी आणि तहसीलदार राहुल सारंग सोबत होते. जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ- दांदळे यांनी त्यांना माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती कक्षासंदर्भात माहिती दिली. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी वृत्तपत्रातील सकारात्मक आणि नकारात्मक बातम्यांचे वृत्तपत्रांना तात्काळ खुलासे पाठविण्याबाबत सूचना केल्यात.
एमसीएमसीकडून नागपूर जिल्ह्यातील सर्व 12 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार आणि प्रसिद्धी साहित्याची छपाईपूर्वी मजकूर तपासणी करणे दृकश्राव्य जाहिरातींची तपासणी करणे, पेडन्यूजसंदर्भातील कार्यवाही करणे, आदी कामे एमसीएमी समितीकडून केल्या जातात, त्याची माहिती श्रीमती वाघ यांनी दिली.