Published On : Fri, May 24th, 2024
By Nagpur Today Nagpur News

विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर

Advertisement

नागपूर: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधान परिषदेच्या 4 जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे.नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून येथील 4 जागांसाठी विधानपरिषद निवडणूक होणार आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तरखा खालीलप्रमाणे –

Gold Rate
Wednesday 07 Jan. 2025
Gold 24 KT 77,400 /-
Gold 22 KT 72,400 /-
Silver / Kg 89,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

-31 मे 7 जून पर्यंत अर्ज भरणार
-10 जून रोजी अर्जाची छाननी
-12 जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार
-26 जून रोजी मतदान होणार
-1 जुलै रोजी होणार मतमोजणी

Advertisement