Published On : Tue, May 1st, 2018

मेट्रोच्या कामासाठी बुधवारी वीज पुरवठा बंद राहणार

नागपूर: अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीसाठी आणि मेट्रोच्या रेल्वेच्या कामासाठी बुधवार दिनांक २ मे २०१८ रोजी पश्चिम नागपुरातील काही भागात वीज पुरवठा बंद राहणार आहे.

सकाळी ७ ते ११ या वेळेत इंद्रप्रस्थ कॉलनी, पाटील ले आऊट, भांडे ले आऊट,पन्नासे ले आऊट, एचबी इस्टेट, सहकार नगर, गजानन नगर, राजीव नगर, चिंतामणी नगर,तपोवन कॉम्प्लेक्स, राहुल नगर, नार केसरी ले आऊट, श्याम नगर, तलमले ले आऊट, भांगे ले आऊट, जीवन छाया नगर, दीनदयाल नगर, लोकसेवा नगर, प्रियदर्शनी नगर, पागे ले आऊट, भामटी , कापसे ले आऊट, आझाद हिंद नगर, इंद्रप्रस्थ नगर, संचयनी कॉम्प्लेक्स, टेलिकॉम नगर, रवींद्र नगर, रामनगर, हिंदुस्थान कॉलनी अमरावती रोड, मरारटोली, तेलंगखेडी, गोंड बस्ती, दक्षिण अंबाझरी मार्ग, लक्ष्मी नगर, बजाज नगर,माधव नगर, अभ्यंकर नगर,हनुमान गल्ली, नेताजी मार्केट या भागातील वीज पुरवठा बंद राहील. बर्डी परिसरातील वीज पुरवठा मेट्रो रेल्वेच्या कामासाठी बंद राहणार आहे.

Gold Rate
Wednesday12 Feb. 2025
Gold 24 KT 85,200 /-
Gold 22 KT 79,200 /-
Silver / Kg 94,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सकाळी ९ ते ११ वेळेत मेडिकल कॉलनी, अजनी रेल्वे स्टेशन, शिवाजी सायन्स कॉलेज, छोटी धंतोली येथील तर सकाळी ७ ते १० या वेळेत मालवीय नगर,पांडे ले आऊट, योगक्षेम ले आऊट, खामला, न्यू स्नेह नगर परिसरातील वीज पुरवठा बंद राहील.

Advertisement