नागपूर : मुंबईहून रचीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.सीकेडी आणि क्षयरोगाने ग्रस्त असलेल्या प्रवाशाची प्रकृति अचानक बिघडल्याने वैमानिकाला हा निर्णय घ्यावा लागला.देवानंद तिवारी (६२) या प्रवाशी रुग्णाचे नाव असून विमानातच रुग्णाला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या.
नागपूरात विमानाचे लँडिंग झाल्यानंतर रुग्णाला KIMS हॉस्पिटल्सच्या रुग्णवाहिकेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (जीएमसीएच) नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. KIMS हॉस्पिटल्सचे DGM-Branding & Communications एजाज शमी यांनी एका प्रसिद्धीपत्रकात या घटनेची माहिती दिली आहे.