नागपूर: ७०० मिमी व्यासाच्या राज भवन –ओंकार नगर मुख्य जलवाहिनीवर मौरीस कॉलेज जवळ १५ जानेवारी रोजी सकाळी अचानकपणे मोठी गळती आढळून आली आहे.
या आकस्मिक गळती दुरुस्तीसाठी मनपा-OCW यांनी ओंकार नगर जलवाहिनी पुर्णपणे थांबवण्याचे ठरवले आहे. ह्या संपूर्ण कामाला जवळपास १२ तास किवा त्याहून जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.
या आकस्मिक ब्रेक डाऊन च्य दुरीस्ती दरम्यान रेशीमबाग, ओंकार नगर, वंजारी नगर १ आणि २, आणि हनुमान नगर जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित सोमवार, दि १५ जानेवारी रोजी सोमवारी संध्याकाळी तसेच दि १६ जानेवारी (मंगळवारी) सकाळी बाधित राहणार आहे.
पाणी पुरवठा ठा बाधित राहणारे जलकुंभ खालीलप्रमाणे:
रेशीमबाग: जुनी शुक्रवारी, महावीर नगर, गणेश नगर, नंदनवन, भागात कॉलोनी, आनंद नगर, शिव नगर , सुदामपुरी, नेहरू नगर आणि गायत्री नगर.
हनुमान नगर: चंदन नगर, वकील पेठ , PTS qtrs., सिरसपेठ, हनुमान नगर, प्रोफेसर कॉलोनी, रेशिमबाग.
वंजारी नगर १: कौसल्या नगर, कुकडे ले आउठ, वसंत नगर, मेदिकॅल कॉलोनी, कुन्जीलाल पेठ, कैलाश नगर, प्रगती नगर आणि बाबुल्खेडा.
वंजारी नगर २: आयुवेदिक ले आउठ, , सोमवारी पेठ, रघुजी नगर, पोलीस वसाहत, सोमवारी पेठ वसाहत, ताज नगर, बजरंग नगर, सावित्री बाई फुले नगर, श्रमजीवी नगर आणि चंद्रमणी नगर.
यादरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठाही शक्य होणार नसल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.