Advertisement
नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे.
या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष संघटन मजबूत करण्यात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही.
पक्षाची ताकद वाढवण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी उपराजधानीत तळ ठोकला आहे. विजयवर्गीय हे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा दौरा करून पक्षाच्या नेत्यांसह विविध गटांच्या भेटीगाठी घेत आहेत.
भाजपने मध्य प्रदेश सरकारचे मंत्री आणि राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा जागांचे प्रभारी बनवले आहे. विजयवर्गीय प्रभारी होताच त्यांनी नागपुरात पक्ष संघटनेचा विस्तार करण्यासाठी हालचाली सुरु केल्या.