वाशिम: होमगार्ड सशक्तीकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून अपघातात प्राण गमावलेल्या वाशिम जिल्ह्यातील दिवंगत एचजी प्रेमसिंग तारासिंह चौहान यांच्या पत्नी लता प्रेमसिंह चौहान यांना ५० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
माहितीनुसार, २१ फेब्रुवारीला २०२३ ला प्रेमसिंग तारासिंह चौहान यांचे अपघातात निधन झाले. यानंतर होमगार्ड सशक्तीकरण उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या पत्नीला विमा म्हणून काही रक्कम सुपूर्द करण्यात आली आहे.
दिवंगत एचजी प्रेमसिंग तारासिंह चौहान यांच्या पत्नी लता प्रेमसिंह चौहान यांना हा विमा आज सुपूर्द करण्यात आला. यादरम्यान डॉ बी के उपाध्याय, डीजी, एचजी , प्रभात कुमार (एडीजीपी, एचजी) आणि एचडीएफसी बँक अधिकारी, कोचर आणि मंजरी (होमगार्ड) जुन्या मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 1.75 कोटी लाभार्थ्यांना एका वर्षाच्या आत विम्याची रक्कम म्हणून दिली जात आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे DGP आणि कमांडंट जनरल, HG डॉ बी के उपाध्याय यांनी दिली.
दरम्यान होमगार्ड (गृहरक्षक दल) म्हणजे भारतातील एक सैनिकीसम स्वयंसेवी पोलिस संघटना आहे. भारतीय पोलिस दलाला साहाय्यकारी असे हे गृहरक्षक दल आहे.