नागपुर/कोराडी : महानिर्मितीच्या कोराडी येथील सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या प्रत्येकी ६६० मेगावाट क्षमतेच्या संच क्रमांक ८, ९ व १० ह्या तीनही संचांची आज माननीय नामदार राजकुमार सिंह, राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा, भारत सरकार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री, महाराष्ट्र तसेच प्रधान सचिव(ऊर्जा) अरविंद सिंग, ऊर्जा मंत्रालय भारत सरकारचे सह सचिव वर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.
वीज केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करताना मा. राजकुमार सिंह यांनी सुपर क्रिटीकल तंत्रज्ञान, वीज उत्पादनाची सध्यस्थिती, कोळसा पुरवठा व दर्जा, बाष्पकाची सुरक्षितता याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर संच क्रमांक ८ व ९ च्या प्लांट नियंत्रण कक्षात त्यांनी महानिर्मितीची संपूर्ण माहिती विषद करणारी चित्रफित बघितली.
याप्रसंगी महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी तपशीलवार असे संगणकीय सादरीकरण केले व सोबतच मा.मंत्री महोदयांच्या विविध प्रश्नांचे समाधान देखील केले. सादरीकरणात प्रामुख्याने, महानिर्मितीची ठळक वैशिष्ठ्ये,स्थापित क्षमता, वीज उत्पादन प्रक्रियेतील परिणामकारक घटक, कोळसा पुरवठा व दर्जा, गरेपालमा-२ खाणपट्टा, सांडपाणी पुन:प्रकिया पाणी वापर, सौर ऊर्जा प्रकल्प, विस्तारित वीज प्रकल्प, वैविध्यक्षेत्रातील वाटचाल तसेच केंद्र शासनाशी निगडीत ज्वलंत विषयांचा सहभाग होता. बैठकीचे सूत्रसंचलन व आभार अभय हरणे, मुख्य अभियंता कोराडी वीज केंद्र यांनी केले.
याप्रसंगी मराविमं सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक, महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, संचालक(खनिकर्म) श्याम वर्धने, संचालक(वित्त) संतोष अंबेरकर, मंत्री महोदयांचे खाजगी सचिव श्री मनोज सिंग, ग्रामीण विद्युतीकरण कोर्पोरेशनचे संचालक एस.के.गुप्ता व कार्यकारी संचालक घोष, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलाश चिरूटकर, विनोद बोंदरे, सतीश चवरे, राजू बुरडे, प्रदीप शिंगाडे(प्रभारी), महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल, मुख्य अभियंते राजकुमार तासकर,सुनील आसमवार, दिलीप धकाते,विजय माहुलकर,धैर्यधर खोब्रागडे,अनंत देवतारे, चंद्रशेखर सवाईतुल, प्रभाकर निखारे, नितीन चांदुरकर, नितीन वाघ, प्रफुल्ल पाठक तसेच उपमुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते, अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.