Advertisement
नागपूर : जामठा परिसरात एका अभियांत्रिकी विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी महाविद्यालयानंतर घरी जात असताना बुधवारी संध्याकाळी हातात कुऱ्हाड घेऊन एक गुराखी तिच्याजवळ आला. त्याने तिला कुऱ्हाडीचा धाक दाखवून जामठा येथील एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
ही बाब गुरुवारी उघडकीस आल्याने तातडीने कारवाई करत नागपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान याप्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.