वाड़ी(अंबाझरी): गणपति उत्सव संपत नाही तोच सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांनी गत 15 दिवसापासून आकर्षक मंडप सजावटीची सुरु केलेली तयारी पूर्ण झाली,अनेक सार्वजनिक दुर्गा मंडळांनी रात्रि उशीरा पर्यन्त नागपुरहुन सजविलेल्या वहनावर माँ दुर्गा ची मूर्ति वाड़ी, दत्तवाड़ी,अमरावती मुख्य मार्गापर्यन्त आणली,या ठिकाना हूण विविध नगरातील मंडळांनी वाद्य वृंद व उत्साहात स्थापनेच्या ठिकाणी आकर्षक मंडपात मूर्तीची स्थापना केली.
आरती ,पूजा,प्रसाद वितरनाने नवरात्रिला प्रारम्भ झाला.वाड़ी ,दत्तवाड़ी सोनबानगर, लावा, दवलामेटि, वडधामना, डिफेन्स, सोनेगांव इ क्षेत्रात 45 सार्वजनिक दुर्गा प्रतिमेची स्थापना करण्यात आली असून ,सर्व मंडळ पदाधिकारी याना सुरक्षा,देखभाल, नियम, डीजे वाजविने, ई नियम पालन व सहकार्य बाबत योग्य सुचना देण्यातआल्याची माहिती देण्यात आल्याचे समजते.बहुतांश माँ दुर्गा प्रतिमेचे स्वरूप जवळपास सारखे दिसून येतात, मात्र आयुध निर्माणी अम्बाझरी येथील बंगीय संसद परिसरात स्थापित प्रतिमा पूर्ण पने कलकत्ता-बंगाल पैटर्न वर आधारित असते.तसेच ही देवी फ़क्त 5 दिवसाची बंगाली समाज द्वारे उत्सव सम्पन्न होतो.
विविध मंडळांनी नवरात्रि दरम्यान अनेक धार्मिक सह गरबा चे ही आयोजन केल्याची माहिती दिली. इंद्रायणी नगर येथे लोकमान्य शाळेसमोर अश्विन बैस, सुरक्षा नगर येथे माजी सरपंच बेबीताई ढबाले,प्रवीण लिचड़े ,वसंत विहार परिसरात सामाजिक कार्यकर्ते शत्रुघ्न परिहार, मारोती नगर येथे राजेश थोराने व शैलेश थोराने, कण्ट्रोल वाड़ी बाजार परिसरात गुप्ता परिवार व दुकानदार,ई नि आकर्षक तयारी केली,