कामठी : -स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयातील इतिहास विभाग द्वारा शैक्षणिक सत्र 2019-20करिता इतिहास अभ्यास महामंडळाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.कार्यक्रमाला प्रस्ताविकेत इतिहास विभाग प्रमुख व इतिहास अभ्यास मंडळाचे समन्वयक डॉ जितेंद्र तागडे यांनी प्रत्येक शैक्षणीक सत्रात नवीन कार्यकारिनी गठीत करून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमा सोबतच नवीन उपक्रम राबवून विषयात रुची वृद्धिंगत करण्याचा उद्देश स्पष्ट केला.सल्लागार समिती व महाविद्यालयाचे सि.डी.सी. सदस्य डॉ जयंत रामटेके यांनी विद्यार्थ्यांच्या गठीत कार्यकरिणीला इतिहास विभागाच्या नवनविन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी नवगठीत कार्यकरिणीत अध्यक्ष रजत गजभिये, उपाध्यक्ष हुसैन फातिमा, सचिव निकिता म्हात्रे,सहसचिव सबाहत शेख,कोषाध्यक्ष अताहूल रहमान, सदस्य ज्योत्स्ना दांडेकर, नितेश कांबळे, निकिता गायधने, प्रीती सिंग, अभिषेक गजवे, गुलफशा नाज, जुनेद रजा यांचे महाविघालायचे प्राचार्य डॉ महेंद्र बागडे तसेच कार्यकारिणीचे पूर्व अध्यक्ष व एबीविपी कामठी शहराचे नगर मंत्री उमेश कनोजियाने अभिनंदन केले.कार्यक्रमाचे संचालन पूजा जीवतोडे तर आभार दानिश शेखणे यांनी मानले.
संदीप कांबळे कामठी