Published On : Mon, Dec 13th, 2021
By Nagpur Today Nagpur News

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘एसएमसीए’ची स्थापना

Advertisement

नागपूर: दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या विधी विभागाच्या वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी स्टुडंट्स मूट कोर्ट असोसिएशन (एसएमसीए)ची स्थापना करण्यात आली. या असोसिएशन नवीन पदाधिकाऱ्यांचा पदस्थापना सोहळा शनिवारी झाला.

तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पदस्थापना समारंभाची सुरुवात झाली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. जी. रेवतकर, तर विधी विभागाच्या प्रमुख डॉ. एच. व्ही. मेनन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ९ मुख्य समिती सदस्यांसह एकूण २६ कार्यकारी समिती सदस्यांचा समावेश असलेल्या एसएमसीएची औपचारिक स्थापना झाली. यावेळी स्टुडंट्स मूट कोर्ट असोसिएशनच्या नवनियुक्त अध्यक्षपदाचा कार्यभार सोनिया श्रीनिवासन यांनी, तर सचिवपदाचा कार्यभार वेदांत व्यवहारे यांनी स्वीकारला. अध्यक्षा सोनिया श्रीनिवासन यांनी विभागाच्या उपक्रमांना नवीन उंचीवर नेण्यासाठी त्यांची टीम विशेष प्रयत्न करेल, अशी ग्वाही दिली.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उपप्राचार्य डॉ. रेवतकर यांनी अध्यक्षीय भाषणात एसएमसीएच्या नवनियुक्त विद्यार्थी सदस्यांचे स्वागत केले. तसेच नवोदित वकिलांसाठी एसएमसीएचे उपक्रम किती महत्त्वाचे आहेत, यावर भर दिला. विधी विभागाच्या प्रमुख डॉ. मेनन यांनीही यावेळी उपस्थितांना संबोधित केले. विधी विभागाच्या पर्यवेक्षक डॉ. वर्षा देशपांडे यांनी एसएमसीएच्या महत्त्वाच्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन सलोनी गुप्ता व सुरभी सायनकर यांनी केले, तर आभार वेदांत व्यवहारे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या पदस्थापना सोहळ्याला विभागातील सर्व प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रत्यक्ष तसेच ऑनलाइनच्या माध्यमातून उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्व कोव्हिड नियमांचे काटेकोरपणे पालन केले.

Advertisement
Advertisement