Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही शरद पवार हेच आमचे दैवत आहेत, असे स्पष्ट वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजकीय वर्तुळात नवा चर्चेचा विषय निर्माण केला आहे. पिंपरीतील कार्यक्रमात ते बोलत होते.
शरद पवार हे आमचे कालही दैवत होते, आजही आहेत. पण देशासाठी मोदींना साथ देणे गरजेचे आहे,असे त्यांनी नमूद केले.
जागतिक आर्थिक स्थितीवर भाष्य करताना त्यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले.,मोदींनी बांधलेल्या आंतरराष्ट्रीय नात्यांचा फायदा भारताला मिळतो आहे.
यादरम्यान अजितदादांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा दिला की, तळ्यात-मळ्यात न राहता ठाम भूमिका घ्या. तसेच कार्यक्रमात अण्णा बनसोडे यांच्या जीवनप्रवासाचे कौतुक करत पानटपरी ते विधानसभा उपाध्यक्ष हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे अजित पवार म्हणाले.