नागपूर – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वीच्या निलकालांतर लगेचच इयत्ता १० विचा निकालही जाहीर केला आहे. यंदा सीबीएसई बोर्डाचे इयत्ता १० वीतील ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याही निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले. मुलांपेक्षा मुलींना १.९८ टक्क्यांनी चांगली कामगिरी केली असून मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.२५ टक्के तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.२७ टक्के इतके आहे. त्यामुळे सीबीएसईच्या इयत्ता १२ वीच्या निकालाप्रमाणे इयत्ता १० वीच्या निकालातही मुलांपेक्षा मुलीच वरचढ ठरल्या.
विद्यार्थी cbseresults.nic.in, cbse.nic.in आणि cbse.gov.in वरून आपला निकाल पाहू शकतील. विद्यार्थी रोल नंबर, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र आयडी साईटवर टाकून हा निकाल पाहता येईल.
सीबीएसईने यंदा १२ वीप्रमाणे इयत्ता १० वीतीलही टॉपर्स आणि मेरीट लिस्ट जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे.