वासुदेव नगर नागरिक मंडळ हिंगणा रोड नागपूर च्यां वतीने आज दी 1/11/2020 रोजी वासुदेव नगर गार्डन मध्ये सकाळी आठ वाजता श्रमदान आयोजित केले होते. मंडळाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष डॉ संजय उत्तरवार ह्यांनी श्रमदान चे महत्व सर्वांना समजावून सांगितले.
समाजाकडून आपण खूप काही घेतो , त्यामुळे आपण समाजाचं देणं लागतो हा विचार त्यांनी सर्वांच्या मनात रुजविला. समाजाच्या ऋण ची परत फेड ही सर्वांनी केली पाहिजे हा विचार त्यांनी बोलून दाखविला. गार्डन ला येऊन नियमित व्यायाम करा असा सल्ला त्यांनी सर्वांना दिला.
कॉर्पोरेशन कडून ग्रीन जिम गार्डन मध्ये लावून मिळाला आहे, त्याचा उपयोग करा असे सांगितले व तसेच प्राणायाम व योगा ह्यांनी कोरोना वर कशी मात करता येते हे समजावून सांगितले. वासुदेव नगर नागरिक मंडळा तर्फे नियमित समाज सेवेचे कार्यक्रम घेण्यात येतात.
मंडळाचे सचिव डॉ मोगलेवार ह्यांनी उपस्थितांचे आभार मानले व पुढील रविवारी सुद्धा आपण श्रमदान करू असे जाहीर केले. चहापान नंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.