नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. नागपूर मतदासंघात भर उन्हात नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत. शहरात मतदान शांतपणे सुरु असताना सोशल मीडियावर मतदानाला गालबोट लागणार एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण मतदान केंद्रात जात ईव्हीएमवर शाईफेक करत मुर्दाबादचे नारे देत असल्याचे दिसत आहे. तसेच हा व्हिडीओ उत्तर नागपूरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पण ‘नागपूर टुडेने’ या व्हिडीओ मागची पडताळणी करत यामागची सत्यता जाणून घेतली.
हा व्हिडीओ २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा असून महाराष्ट्रातील ठाणे शहरातला आहे. बहुजन समाज पक्षाचे नेते सुनील खांबे यांनी ईव्हीएमचा निषेध करत मशीनवर शाईफेक केली. तसेच ईव्हीएम मुर्दाबादचे नारे देत गोंधळही घातला.यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी बसपा नेते सुनील खांबे यांना ताब्यात घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ नागपूरचा नसल्याचे समोर आले आहे.
View this post on Instagram