Published On : Fri, Apr 26th, 2019

मतदारांचे मत चोरीला! नाना पटोले यांचा आरोप

Advertisement

नागपूर: रामटेक मतदारसंघातून ईव्हीएम मशीन्स आणायला वेळ लागू शकतो मात्र नागपूरातील सर्व मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन्स कळमनापर्यंत पोहोचावयालाही ४८ तासांचा वेळ कसा लागू शकतो?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. निवडणूक होण्यापूर्वीच आम्ही व्हीडीयोच्या माध्यमातून मतदान केंद्रावरील सुरक्ष्ेचा प्रश्‍न उपस्थित केला होता. न्यायालयात देखील गेलो मात्र येथील मुख्य निवडणूक अधिकारी यांनी न्यायालयात देखील खोटे बोलले. उमेदवार म्हणून आम्हाला ईव्हीएम मशीन्स तपासण्याच्या अधिकार आहे असे न्यायालयाने देखील सांगितले.

शनिवार असतानाही न्यायालयाने ही सुनावणी केली. मात्र आजपर्यंत आम्हाला नागपूरच्या जिल्हाधिकारी यांनी ईव्हीएम मशीन्स तपासूच दिले नसल्याचा आरोप पटोले यांनी केला. मिडीया समोरच नव्हे तर जिल्हाधिकारी हे न्यायालयातही खोटे बोलले. निवडणूकीच्या ५ दिवसांपूर्वी मतदारांच्या घरी मतदार ओळख पत्र पोहोचवण्याचा नियम असताना नागपूरात असे घडलेच नाही. उलट एकाच कुटुंबातील चार सदस्यांची नावे चार वेगवेगळ्या मतदान केंद्रावर टाकून देण्यात आली. सर्वात जास्त् असे प्रकार मुस्लिम वस्तीत घडल्याचा आराेप त्यांनी केला. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात ‘मतदारांचे मतच चोरीला ’गेल्याचा आरोप त्यांनी केला.

Gold Rate
Wednesday 19 March 2025
Gold 24 KT 88,900 /-
Gold 22 KT 82,700 /-
Silver / Kg 101,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केंद्रिय निवडणूक आयोगाने अतिशय स्पष्टपणे आपल्या पुस्तकात सगळे नियम,कायदे अधोरेखित केले आहेत. यात आचारसंहितेसंबधीचे नियम हे उमेदवारांप्रमाणेच प्रशासकीय अधिकार्यांनादेखील लागू होतात मात्र नागपूर असो किंवा रामटेक लोकसभेच्या दोन्ही जागांवरील निवडणूकीत, निवडणूक अधिकारी यांनी कोणतेही नियम पाळले नसल्याचा गंभीर आरोप नागपूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केला. शुक्रवारी नागपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्र-परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर रामटेक मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये, मा.आ. राजेंद्र मुळक, शहराध्यक्ष् विकास ठाकरे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, अभिजित वंजारी, नाना गावंडे आदी उपस्थित होते.

नागपूरचा मीडीया सर्वाधिक जागरुक असल्याचे सांगून उमरेड येथील स्ट्रांग रुममधील डीव्हीआर चोरीचा उलगडा हा देखील मीडीयाच्या जागरुकतेमुळेच उघडकीस असल्याचे त्यांनी सांगितले. डीव्हीआर चोरी होऊन सहा दिवस उलटली तरी प्रशासन,पोलीस सगळेच गप्प होते. यात निवडणूक अधिकारी यांची देखील भूमिका संशयास्पद असून लोकशाहीला घातक असल्याचे ते म्हणाले. निवडणूका या मुक्त वातावरणात झाल्या पाहीजे असा कायदा असताना नागपूर व रामटेक मतदार संघात निवडणूक आयोगाच्या आदेशालाच हरताळ फासण्यात आले असल्याचे ते म्हणाले. आम्हाला न्यायालयानेच मुभा दिली आहे आम्ही पुन्हा जुन्याच पिटीशनच्या आधारे न्याय मागू शकतो. नागपूरातील सर्व मतदान केंद्रातील रेकॉर्डिंग बघण्याची आम्ही मागणी करणार आहोत. मतदान केंद्रांपासून कळमना येथील स्ट्रांग रुमपर्यंत सर्व ईव्हीएम मशीन्स ठेवण्यात आल्या त्या दरम्यानच्या ४८ तासाचे रेकॉर्डिंग आम्ही तपासणार आहोत.

२३ मे रोजी मतमोजणीच्या दुसऱ्या-तिसऱ्या फेरीतच आम्हाला सगळे गौडबंगाल कळून जाईल मात्र योवळी ग्राऊंड असे बनवले आहे की निशाना चूकणार नाही असे सूचक विधानही ते करायला विसरले नाहीत. निवडणूकीत हार किवा जिंगणे हा नंतरचा प्रश्‍न असतो प्रशासकीय अधिकारी यांच्या मदतीने लोकतंत्राचा गळा मात्र आम्ही घोटू देणार नाही, असा ईशारा पटोले यांनी यावेळी दिल

Advertisement
Advertisement