नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात एकापाठोपाठ एक हत्यांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे.शहरातील गुन्हेगारी विश्वात कायदा आणि पोलिसांचा धाक संपला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत. शहरात वेगवेगळ्या हत्येचे हत्यासत्राचे उदाहरण ताजे असतांनाच आज भरदिवसा नागपूर टाइम्सचे माजी पत्रकार विनय उर्फ बबलू पुणेकर यांची अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय हा त्याच्या राज नगर घरी असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. यात त्याची जागीच हत्या झाली. या घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरु केला आहे.
दरम्यान फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत सार्वधिक खुनाच्या घटनेने शहर हादरले आहे.