– देशपातळीवरील परीक्षा शांततेत , परिचारीकेच्या पदाकरीता नागपुरात परीक्षा
नागपूर: स्टॉफ नर्स या पदाकरीता रविवारी देशपातळीवर घेण्यात आलेल्या परिक्षेकरीता हजारो परिक्षार्थीनी नागपुरात हजेरी लावली. दुपारी परीक्षा पार पडताच साèयांनाच घरी जाण्याची घाई असल्याने रेल्वे स्थानक फुल्ल झाले होते. आधीच बॉम्बची अफवा, त्यात हजारो परिक्षार्थिंची भर पडल्याने सुरक्षा व्यवस्थेची तारांबळ उडाली होती. काही जन मिळेल त्या गाडीने निघाले तर काहींनी स्टेशनवरच थांबने पसंत केल्याने गर्दीत पुन्हा भर पडली.
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड करीता (स्टाफ नर्स) रविवारी देशपातळीवर परीक्षा घेण्यात आली. बीएसस्सी आणि जनरल नर्सिगचे विद्यार्थी या परिक्षेसाठी पात्र होते. परीक्षेसाठी नागपूर हे एकमेव केंद्र होते. त्यामुळे हजारो परिक्षार्थि एक दिवसापूर्वी म्हणजे शनिवारीच नागपुरात पोहोचले. काहींनी आधीच केंद्राची खात्री करून घेतली. परिक्षार्थिंमुळे जवळपासचे लॉज, हॉटेल फुल्ल झाले होते. तर काहींनी रेल्वे स्थानकावरच रात्र काढली. दुपारी २ ते ३.३० असा परीक्षेचा कालावधी होता. त्यामुळे परिक्षार्थिी एक तासाआधीच केंद्रावर पोहोचले. रेल्वे स्थानकाजवळील ऑटोरिक्षा चालकांनी तीन कि.मी.चे शंभर रुपये घेतल्याचे परिक्षार्थिंनी सांगितले.
अलिकडे ऑन लाईन परीक्षा घेतली जाते. मात्र, स्टॉफ नर्स या पदाकरीता घेण्यात आलेली परीक्षा ऑफ लाईन अर्थात पेपर होता. दिड तासाचा पेपर संपताच रेल्वे स्थानकावर गर्दी वाढायला लागली. तसेही शनिवार आणि रविवार असे दोन दिवस रेल्वे स्थानकावर गर्दी असते. त्यातही सायंकाळी गाड्या असल्याने गर्दी पुन्हा वाढते. दरम्यान परीक्षा संपल्यानंतर या गर्दीत पुन्हा भर पडली.
तर दुसरीकडे शनिवारच्या रात्रीपासून गरीब रथ एक्स्ेप्रसमध्ये बॉम्बच्या अफवेने सुरक्षा व्यवस्थेची चांगलीच धावपळ झाली. आजही गरीब रथ एक्स्प्रेसची झाडाझडती झाली दरम्यान परिक्षार्थिंनीची गर्दी वाढल्याने सुरक्षा व्यवस्थेची चांगलीच तारांबळ उडाली. काहींनी मिळेल त्या गाडीने घरी निघाले तर काही जनांनी स्टेशनवरच मुक्काम ठोकला.