नागपुर : नागपूर स्मार्ट एंड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट र्कोरपोरेशन लिमिटेडच्या वतीने पारडी, पुनापुर, भरतवाडा व भांडेवाडी भागाचे नागरिकांसाठी अकृषि सेस शिबिराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यत या शिबिरात २५०० अर्ज अकृषि सेस भरण्यासाठी नागरिकांनी दिले आहे.
भरतनगर मराठी उच्च प्रा. शाळा, सुभाष नगर पाण्याच्या टाकी मागे होणा-या या शिबिराची वेळ ही सकाळी १०.०० वाजे पासून ते संध्याकाळी ५.०० वाजे पर्यंत आहे. प्रस्तुत शिबीर दि. २० जुलै पर्यंत राहील. तथापि नागरिकांची मागणी लक्षात घेता तारखेमध्ये वाढ करण्यात येईल.
श्री. सुखदेव वासनिक, तहसीलदार (अकृषि) यांच्या नेतृत्वात श्री. देवेंद्र शिरोळकर, श्री. अजय चव्हाण, सुश्री माधुरी टेकाडे व श्रीमती छाया ताजने अकृषि सेस ची कार्यवाही करीत आहे.
शिबिरा मध्ये स्मार्ट सिटीचे अधिकारी मोईन हसन, श्रीकांत अहीरकर व भूषण राऊत उपस्थित होते. या शिबिरा मध्ये नागरिकांनी जमीनशी संबंधित दस्तावेज घेवून उपस्थित राहण्याचे आवाहन एन.एस.एस.सी.डी.सी.एल. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश मोरोणे यांनी केले आहे.