Advertisement
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर गुरुवारी घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली. रेल्वे स्थानकावर थांबलेल्या १२२९५ संघमित्रा एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचच्या टॉयलेटमध्ये एक निर्जीव मृतदेह आढळून आला. अज्ञात मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
गाडीतील एक प्रवाशी प्रसाधनगृहात जाताच त्याला त्याठिकाणी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रेनमधील प्रवाशांचे जबाब नोंदविले.
ही बातमी पसरताच संपूर्ण स्टेशनवर गोंधळ निर्माण झाला. गाड्यांच्या आगमनाची आणि सुटण्याच्या प्रतीक्षेत असलेले प्रवाश्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.