Advertisement
नागपूर : नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत केडीके कॉलेज जवळील नाल्यात वृद्ध नागरिकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ निर्माण झाली. या घटनेची माहिती मिळताच दनवन पोलीस घटनास्थळी दाखल. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने नाल्यातून वृद्ध नागरिकाचा मृतदेह काढण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.