Published On : Tue, Jun 18th, 2024

नागपुरात बकरी ईदचा उत्साह, मुस्लिम बांधवांकडून एकत्रित नमाज पठण

- पोलीस आयुक्तांची दिल्या शुभेच्छा
Advertisement

नागपूर : शहरात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी सामुदायिक नमाज पठणानंतर एकमेकांनी गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या.नागपूरच्या मोमीनपुरा परिसरात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी मुस्लिम बांधवांना पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

मोमीनपुरा येथे आज सकाळपासूनच जुन्या बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांची गर्दी होऊ लागली होती. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत नमाज अदा करण्यात आली. या प्रार्थनेवेळी लहान मुलांचाही सहभाग लक्षणीय होता.

Advertisement

नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाज अदा केल्यानंतर विश्वशांतीसाठी, बंधूभाव जोपासण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.