नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या लोककर्म विभागातील कार्यकारी अभियंता आर.जी. खोत, ए.बी. कडू यांच्यासह २३ अधिकारी, कर्मचारी शुक्रवारी (ता. ३१) सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित्त मनपाच्या वतीने मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित कार्यक्रमात शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तुळशी रोप आणि धनादेश देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
मनपाचे निगम अधीक्षक मदन सुभेदार, सहायक अधीकक्ष मनोज कर्णिक, सहायक अधीक्षक (पेंशन) नितीन साकोरे यांच्या हस्ते सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये लोककर्म विभागाचे कार्यकारी अभियंता आर.जी. खोत, ए.बी. कडू, राजस्व निरिक्षक पी.व्ही. डाखोळे, कनिष्ठ लिपिक आर.सी. खंडागळे, कनिष्ठ लिपिक व्ही.एस. देवतळे, व्ही. व्ही. इंगेवार, मुख्याध्यापक नुसरत कौसर हासमी, सहायक शिक्षिका रमा डफरे, यूटीडी राजेंद्र मसराम, फायरमन ए.एन. पाटील, एस. ए. नन्हे, मजदूर यशवंत नेवार, चपराशी सुधाकर सूर्यवंशी, हरिश बैगणे, कलीम शेख करीम, क्लिनर दिलीप महाकाळकर, आरोग्य विभागातील कृष्णा चौधरी, अमरनाथ बिरहा, दिलीप वमन, अशोक दिवटे, विमल गौरे, शशिकला पांडे, सामान्य प्रशासन विभागातील गणपत बाराहाते यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे संचालन सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी केले. यावेळी श्रीमती पुष्पा गजघाटे, राजू लोणारे, केशव कोठे, डोमाजी भडंग, दिलीप देवगडे, किशोर तिडके, दिलीप तांदळे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.