Published On : Mon, Jun 27th, 2022
By Nagpur Today Nagpur News

अस्तित्व असताना तेवढं महत्त्व मिळत नाही जेवढं ‘ ती ‘ व्यक्ती किंवा वस्तू नाहीशी झाल्यावर मिळत असते ” – मेहदी जहान ( दिग्दर्शक )

Advertisement

जीवन जगताना आपल्याला या गोष्टीचा अनुभव नक्की येईल की कोणती वस्तू किंवा व्यक्ती जेव्हा अस्तित्वात असते तेव्हा बहुतांशी वेळा ती दुर्लक्षित असते आणि जेव्हा ‘ती’ या जगातून निघून जाते तेव्हा मात्र तिची आठवण वारंवार येऊन तिचे महत्त्व अधिकच वाढत जाते .
एक कथाकार जेव्हा कथा लिहितो आणि कथा सांगणारा जेव्हा ती इतरांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोचवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती कथा ऐकण्यासाठी बघण्यासाठी समाजाची गरज भासत असते या गोष्टींचा प्रत्यय आज दोन्ही लघु चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक मेहदी जहान यांच्याशी चर्चेदरम्यान सर्व रसिकांना आला .

आम्ही कथाकथनाबद्दल आणि पात्रे त्यांच्या कथाकथनाशी संबंध कसा असतो हे चित्रपटात कसे दाखवले गेले यावर आम्ही चर्चा केली. कथा सांगण्यासाठी समाजाची गरज; कोणी सांगावे तर कोणी ऐकावे. दोन्ही चित्रपटांच्या घटनांपेक्षा जास्त; मेहदी जहान यांच्याशी झालेल्या संवादात कल्पना आणि विचार प्रक्रियेवर चर्चा झाली.

Gold Rate
03 April 2025
Gold 24 KT 91,900 /-
Gold 22 KT 85,500 /-
Silver / Kg 98,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

औचित्य होते रविवार,दिनांक 26 जून 2022 रोजी ‘ही यूज्ड टू ब्रिन्ग मी एप्पल’ व ‘ ज्योती अँड ज्योमोती’ या दोन शॉर्ट फिल्म्स चं स्क्रिनिंग चे . संध्याकाळी 7:०० वाजता विदर्भ राष्ट्रभाषा प्रचार समिती, रामदासपेठ येथे दोन आसामी लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले . दोन्ही चित्रपट पात्रांच्या वैयक्तिक आठवणी आणि आसामच्या दुर्गम भागातील ऐतिहासिक घटनांमधील परस्परसंवादाचा शोध आहेत.
दोन्ही शॉर्ट फिल्म्स चं दिग्दर्शन मेहदी जहान यांचं असून स्क्रिनिंग नंतर दर्शकांच्या प्रश्न उत्तरांसाठी दृक श्राव्य माध्यमावर चर्चा सत्र देखिल आयोजित करण्यात आले होते.

सदर कार्यक्रम हा मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशन,नागपूर यांनी आयोजित केला होता . मेराकी थिएटर प्रत्येक रविवारी ज्या सहजासहजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर किंवा प्रत्यक्ष मोठया फिल्म फेस्टिव्हल मध्ये जाऊन बघणं शक्य होत नाही अश्या डॉक्यूमेंटरी,शॉर्ट फिल्म्स चं स्क्रिनिंग आयोजित करत असते.

Advertisement
Advertisement