नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतदान संपताच एक्झिट पोलचे अंदाज समोर आले.बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीचे सरकार सत्ते येणार असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
परंतु, काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्झिट पोल मान्य केलेले नाहीत. एक्झिट पोल हे एक्झॅक्ट पोल नसतात, राज्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रोश होता. त्यामुळे लोकांना बदल हवा आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तोडफोड करून हे सरकार बनवले होते.त्यामुळे २३ तारखेपर्यंत आपण सर्वांनी निकालाची वाट पाहाव. निकालात काय ते स्पष्ट होईल. यावर जास्त भाष्य करणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.