Advertisement
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील धामना जवळील चामुंडा बारूद कंपनीत मोठा स्फोट झाल्याची माहिती आहे. या घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना सेनगुप्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख घटना स्थळी रवाना झाले असून त्यांनी घटनेसंदर्भात माहिती घेतली.
प्रांजली मोदरे (२२),प्राची फलके (२०) , वैशाली क्षीरसागर (२०), मोनाली ओलाने(२७),पन्नालाल बंदेवार (५०)अशी मृतकांची नावे आहेत. तर श्रद्धा पाटील(२२), शीतल चाप(३०), दानसा मरसकोल्हे (२६) , प्रमोद चवारे (२५) यांच्यासह अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.