नागपूर : शहरातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे मंगळवारी सदर हॉटेल दुआ कॉन्टिनेंटलमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. महिलांना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दाम्पत्यानाही पोलिसांनी अटक केली. तर कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली.
अलका इंद्रजीत हेडाऊ (28) आणि इंद्रजीत जगदीश हेडाऊ (36, दोघेही रहिवासी, सुभाष चंद्र हॉस्पिटल, तहसीलजवळील घर क्रमांक 46 खडखडी मोहोल्ला) असे अटक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.
माहितीनुसार, पीआय कविता इसरकर यांच्या नेतृत्वाखालील एसएसबी पथकाला सदर येथील हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. पडताळणीनंतर पोलिसांनी मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. यादरम्यान झालेल्या कारवाईत पोलिसांनी पती -पत्नीला अटक केली.
दरम्यान सदर पोलिसांनी आरोपी दाम्पत्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.