नागपूर : शहरातील सावनेरातील रॉयल लॉजवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या छाप्यात एका तरुणीला ताब्यात घेतले असून दोन तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रुण मदनमोहन रुषिया (जुना धान्यगंज, सावनेर) आणि रंजीत मारोतराव वानखडे (२९, झिल्पा. ता. काटोल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
मागील अनेक महिन्यांपासून सावनेरातील रॉयल लॉजवर सेक्स रॅकेट सुरु होते. या लॉजवर नागपुरातील अनेक तरुणी देहव्यापार करत असल्याची माहिती आहे. यात महाविद्यालयीन तरुणींचाही समावेश आहे. सोमवारी ग्रामीण पोलिसांनी लॉजवर धाड टाकली. यादरम्यान एका तरुणीसह रंजीत वानखडे हा देहव्यापार करताना आढळला.
त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित तरुणीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. ती तरुणी उच्चशिक्षित असून आर्थिक स्थितीमुळे ती देहव्यापार करीत होती. पोलिसांना याबाबतची गुप्त माहिती मिळताच त्यांनी कारवाईचा बडगा उचलला.