Advertisement
नागपूर : हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून नागपुरात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. विरोधी पक्षांकडून नेहमीच नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली जाते .
आता पुन्हा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किमान दोन दिवस वाढवा, अशी मागणी केली आहे. मात्र अधिवेशनाचा कालावधी का वाढावा यासाठी वडेट्टीवार यांनी कारणही सांगितले आहे.
मुंबई येथे विधानभवनात दि. 29 नोव्हेंबर, 2023 रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकीत दिनांक 19 डिसेंबर, 2023 रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन अधिवेशन कालावधी वाढविण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असा सर्वानुमते निर्णय झाला होता, त्याप्रमाणे निर्णय घ्यावा, अशी विनंती वडेट्टीवार यांनी केली.