मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी काही कारणास्तव ज्या शेतकऱ्यांना अर्ज करता आले नाही, त्यांच्यासाठी अर्ज करण्याची आज अंतिम तारीख होती. मात्र आता त्यास दि. १ मे २०१८ मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे जाहीर केला. या निर्णयामुळे वंचित राहिलेले पात्र शेतकरी अर्ज करु शकतील.
यापूर्वी योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि.१४ एप्रिल २०१८ पर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र पात्र शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये याकरिता आज मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा अर्ज करण्याची मुदत वाढविली आहे. वन टाईम सेटेलमेन्ट योजनेसाठी यापूर्वीच दि.३० जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.