Advertisement
रामटेक : नागपूर जिल्हा मैदानी क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्यात. या स्पर्धांमध्ये विद्यासागर कला महाविद्यालयाच्या कु. गौरी उईके आणि कु. पूनम कोडवते या दोन्ही विद्यार्थिनींनी भालाफेक , गोळा फेक आणि थाळी फेक या क्रीडा प्रकारात तीन रजत पदके प्राप्त केलेत.
कु.पूनम कोडवते हिने गोळा फेक आणि थाळी फेक या स्पर्धा मध्ये रजत पदक प्राप्त केले तर कु. गौरी उईके हिने भाला फेक स्पर्धेत रजत पदक मिळवले.
या दोन्ही विजयी खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पिल्लई ,क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल दाणी तसेच सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले.