उस्मानाबाद :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी श्रीतुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी तुळजाभवानीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख हे उपस्थित होते.