नागपूर. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या तीनही राज्यांतील हा निकाल मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात देशाची विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या वाटचालीला गती देण्यासाठी जनतेने दाखविलेला विश्वास आहे. देशाने विविध क्षेत्रात आज जगाच्या पटलावर ठळकपणे आपली छाप उमटविली आहे.
महिलांपासून ते युवकांपर्यंत, दिव्यांग, क्रीडापटू या सर्वांसाठीच कल्याणकारी विकासाच्या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात राबविल्या जात आहेत. देशाच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने सुरू असलेल्या सर्वंकष विकास कार्याला जनतेने आपली पसंती दर्शवून भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखविलेला आहे.
देशातील केवळ तीनच राज्य नव्हेत तर संपूर्ण १४१ कोटी जनता आज मोदींच्या पाठीशी असल्याचे हे शुभ संकेत आहेत.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकावून भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या विजयावर आपले नाव केरल्याचे स्पष्ट दिसत आहे.