नागपूर : शहरात कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशन तर्फे ११ ऑक्टोबर २०२४ रोजी “कायदेविषयक व्याख्यानमाला” “स्व. पुष्पा सतुजा स्मृती प्रित्यर्थ” चे उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ प्रशासकीय न्यायमुर्ती मा. भारती डांगरे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजीत करण्यात आलेले होते.
न्यायमुर्ती भारती डांगरे मॅडम यांनी संबोधीत करतांना सांगितले की, कौटुंबीक न्यायालयातील वाढत्या प्रकरणाची संख्या लक्षात घेता, हे समाजासाठी चिंताजनक बाब आहे. त्यामुळे कौटुंबीक न्यायालयातील न्यायाधीशांनी कायदयाच्या चौकटीत न राहता सकारात्मक दृष्टीकोन बाळगून प्रकरणामध्ये मधला मार्ग काढून प्रकरणाचा निपटारा लवकरात लवकर कसे होईल याकडे लक्ष दयावे. तसेच याबाबत असे संवेदशील दावे हाताळतांना न्यायाधीश व मध्यस्थांना प्रशिक्षणाची गरज आहे व वकील वर्गांनी समाजाबद्दल आत्मीयता बाळगून प्रकरणे हाताळावे.
ॲड. कमल सतुजा हयांनी सामाजीक बांधीलकी लक्षात घेवून कौटुंबीक न्यायालय नागपूर बार असोसिएशन यांच्या सहकायनि त्यांच्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ व्याख्यानमाला आयोजीत करण्यात आली होती. जेणे करून कौटुंबीक न्यायालयातील कायदे विषयक वकीलांना मार्गदर्शन प्राप्त व्हावे व कायदयातील नव-नवीन बदलांची वकीलांना माहिती व्हावी. याउद्देशाने “स्व. पुष्पा सतुजा स्मृती प्रित्यर्थ” व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास कौटुंबिक न्यायालय, नागपूर वे प्रधान न्यायाधीश हितेश गणात्रा, कौटुंबिक न्यायालय क्र.२ चे न्यायाधीश मोहम्मद ऐजाज, कौटुंबिक न्यायालय क्र.३ चे न्यायाधीश शेख बब्बुसा पाटील, कौटुंबिक न्यायालय क्र. ४ चे न्यायाधीश अनिता गिरडकर, कौटुंबिक न्यायालयचे अध्यक्ष ॲड. रामनाथ सेन, कौटुंबीक न्यायालयचे महासचिव ॲड. वासंती रिणके, वरिष्ठ अधिवक्ता ॲड. फिरदोज मिर्झा, जिल्हा व सत्र न्यायालयचे अध्यक्ष ॲड. रोशन बागडे व सचिव ॲड. मनिष रणदिवे, ॲड कमल सतुजा,ॲड. नितीन देशमुख,ॲड.उषा मानिकपुरे, ॲड . उमा भट्टड, ॲड. आशिष नागपूर, ॲड संदिप बावणगडे, ॲड. मनोज मेंढे, ॲड.निलेश पानतावने, ॲड. आदिल मोहम्मद, ॲड. कुमार पौणीकर, ॲड. कांचन वराडे, ॲड शैला कुरेशी, ॲड.पिंकी कोसारे, ॲड आरती सिंग,ॲड.राजु शेंडे, ॲड.गौतमी नारनवरे, ॲड.कोमल बजाज व इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन ॲड. शबाना खान यांनी केले.