Published On : Sat, Jun 24th, 2023

प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितिन गडकरींची भेट !

Advertisement

नागपूर : प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी जी यांनी आज केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली. यासंदर्भात गडकरी यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून फोटो शेयर करत माहिती दिली. ही एक सदिच्छ भेट असल्याचे समोर येत आहे.

जया किशोरी भारतातील प्रसिद्ध प्रवचनकारांपैकी एक आहे. जया किशोरी या प्रचवनाबरोबर प्रेरणादायी भाषणासाठीही ओळखल्या जातात. त्यांच्या वडिलांचं नाव शिव शंकर शर्मा आहे. तर आईचं नाव सोनिया शर्मा आहे. जया किशोरी यांनी स्वतः ७ वर्षांच्या असतानाच्या आध्यात्माशी जोडून घेतले होते.त्यांची ओळख प्रवचनकार म्हणून आहे. त्यामुळे त्यांची प्रवचन ऐकायला लोक नेहमी गर्दी करतात.

Advertisement