नागपूर: शहरात कोरोना संकटानंतर परिवहन विभागाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार नागपूरकरांमध्ये आपल्या वाहनांसाठी फॅन्सी नंबर प्लेटची क्रेझ वाढली आहे. त्यानुसार निवड क्रमांकांच्या वाटपातून सरकारच्या महसुलात जवळपास 33% वाढ झाली आहे. 2022 मध्ये, राज्याच्या तिजोरीत वाहनांच्या VIP नोंदणी क्रमांकांसाठी नागपूरमधून 4.70 कोटी रुप्याची भर पडली आहे. जे 2021-22 मधील कालावधीत कमावलेल्या 3.15 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
सहाय्यक आरटीओ हर्षल डाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5,000 ते 4 लाख रुपयांपर्यंत जास्त शुल्क असूनही, अनेक वाहन खरेदीदार व्हीआयपी नोंदणी क्रमांकासाठी अधिक पैसे देण्यास तयार आहेत. जास्त मागणी असलेल्या क्रमांकांमध्ये 0007, 0009, 0090, 0099, 1234, 0123, 7007, 7777, 7700, 5555 आणि 0555 यांचा समावेश आहे. आरटीओ जंपिंग मालिका क्रमांक देखील आपल्या वाहनधारकांना प्रधान करते. या क्रमांकासाठी 3,000 ते 7,500 रुपये शुल्क आकारले जाते, असे डाके म्हणाले.
विक्रीसाठी ठेवलेल्या 300 पसंती क्रमांकांपैकी फक्त 100 च्या आसपास मागणी होती आणि उर्वरित क्रमांक विकले गेले नाही. वाहनधारकांना 2018-19 मध्ये, आरटीओने 1.37 कोटी रुपयांची कमाई केली आणि 2019-20 मध्ये, महसूल 2.29 कोटी रुपये होता. तथापि, कोविड महामारीमुळे, 2020-21 मध्ये नवीन वाहनांच्या नोंदणीसह पसंती क्रमांकांची मागणी कमी झाली होती, परिणामी निवड क्रमांकांच्या विक्रीतून आरटीओला 1.96 कोटी महसूल मिळाला.
जेव्हा एका नंबरसाठी एकापेक्षा जास्त अर्ज येतात, तेव्हा त्या नंबरचा लिलाव केला जातो, जो 9, 786, 1234 इत्यादी नंबरसाठी वारंवार होतो. 2022 मध्ये, परिवहन विभागाने पसंती क्रमांक 0001 चे शुल्क 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला. चारचाकी वाहनांसाठी 3 लाख रुपये आणि दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी 50,000 रुपयांच्या चालू शुल्काऐवजी 1 लाख रुपये वाढविण्यात आले आहे.