Advertisement
यवतमाळ: घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. शंकर भाऊराव चायरे (५०) असे या मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. आपल्या दुरवस्थेसाठी त्यांनी मोदी सरकारला दोषी ठरवले आहे. ते घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील रहिवासी होते. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सहापानी पत्रात त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुली, १ मुलगा, जावई असा आप्त परिवार आहे.