जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
नागपूर: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरखपूर येथे प्रारंभ झाला असून, त्यानुषंगाने आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहिती मिळावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाला पालकंमत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी हिरवी झेंडी दाखवली.
यावेळी उपायुक्त श्रीकांत फडके, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस तसरे, तहसिलदार मोहन टिकले यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची शेतकऱ्यांना माहिती देणारा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फिरणार असून, याद्वारे शेतकऱ्यांची जनजागृती होणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.