Published On : Mon, Feb 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नागपुरात मदतीचे आश्वासन !

Advertisement

नागपूर : राज्यातील अनेक ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस पडला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे.अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत करण्यात येईल, त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रामटेक येथे मेळाव्यासाठी नागपुरात आले असताना त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

विदर्भातील नागपूर, वर्धा, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गिरपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूरसह विदर्भाच्या काही भागात शनिवारी रात्री गारपिटीसह अवकाळी पाऊस पडला. नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा, मौदा, भिवापूर तालुक्यातील काही गावात गारपीटसह पाऊस पडलाय. या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे गहू, हरभरा, कांदा, भाज्यांसह रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.

हे सरकार बळीराजाचे आहे.शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत अनेक निर्णय घेतले आहे. त्यात नुकसानभरपाई, एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत, दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर करणे, पीक विमा एक रुपयात देणे यांचा समावेश होता. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना सरकारने कधीही हात टाळाटाळ केली नाही . आता जी गारपीट व अवकाळी पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिक मदत मिळेल, सरकार त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Advertisement