मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी
नागपूर: पावसाळा सुरू होत असून त्यासोबतच शेतकऱ्याचा खरीप हंगामही सुरू होत आहे. यंदाची कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खरीपासाठी राज्य शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना त्यांनी एक पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
कोविड 19 मुळे तीन महिन्यापासून सुरू असलेल्या संचारबंदीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. शेतकऱ्याजवळ बी बियाण्यांसाठी पैसे नाही. शेतकऱ्याची ही आर्थिक कुचंबणा लक्षात घेता शेतकऱ्यांना त्वरित बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
शासनाने ग्रामपंचायत स्तरावर कृषी विभागातर्फे कर्ज मेळावे घेऊन शेतकऱ्यांला बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी आपण करीत आहोत, असेही बावनकुळे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.