नागपूर: प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक रमेश पुणेकर यांनी ओसीडब्ल्यू विरोधात ३१ मे पासून सुरू केलेले उपोषण जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतले सभापती पिंटू झलके यांनी रमेश पुणेकर यांना निंबू पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडविले.
यावेळी नगरसेविका आभा पांडे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, ओसीडब्ल्यूचे राजेश कारला, श्री. नायक प्रामुख्याने उपस्थित होते. काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक २० च्या पाण्यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. यासाठी नगरसेवक रमेश पुणेकर यांनी ओसीडब्ल्यू आणि जलप्रदाय विभागाला पत्र पाठविले. यानंतरही पाण्याच्या तक्रारी ओसीडब्ल्यूने सोडविल्या नाही.
याविरोधात दिनांक ३१ मे पासून रमेश पुणेकर यांनी मस्कासाथ येथे बेमुदत उपोषण सुरू केले. जलप्रदाय समिती पिंटू झलके यांनी पुढाकार घेऊन प्रभागातील सर्व तक्रारी सोडविण्याचे आश्वासन दिले. पाण्यासंबंधित काही तक्रारी सोडविण्यात आलेल्या आहे. पुढच्या दोन दिवसात प्रभागातील सर्व तक्रारी सोडविण्यात येईल, असे आश्वासन पिंटू झलके यांनी दिले. यावेळी ओसीडब्लूचे अधिकारी व डेलीगेट्स यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.