नागपूर : नागपूर-उमरेड रोडवर भिवापूरजवळ गुरुवारी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून डझनहून अधिक जण जखमी झाले आहेत. माँ दुर्गा ट्रॅव्हल्स संचलित ट्रक आणि खासगी बसची धडक झाल्याने हा अपघात घडला.
मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार,भरधाव ट्रक चालकाने बेपर्वाईने ट्रक चालवला त्यामुळे बसची समोरासमोर धडक झाली.या अपघात ट्रक पालटीहून बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे काही वेळासाठी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.