नाशिक : मनमाड येथे मुंबई -आग्रा महामार्गावर चांदवडजवळच्या सोग्रस गावाजवळ दोन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. आडगाव शिवारात गुरुवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. वाळूच्या ट्रकमध्ये बिघाड झाल्याने हा ट्रक रस्त्याशेजारी उभा होता.
यावेळी याच मार्गावरुन जाणाऱ्या लक्झरी मिनी बसचे अचानक टायर फुटल्यानंतर बस ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात दहा जण जागीच मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले आहेत.
मृत्युमुखी पडलेले सर्व जण उल्हासनगर व कल्याण परिसरातील रहिवासी होते. मृतांची ओळख पटवण्याचे कार्य सध्या सुरू आहे.
दरम्यान, हे सर्व जण ओंकारेश्वर उज्जैन येथील देवदर्शन करुन उल्हासनगरकडे परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. मृतांमध्ये सात महिला, दोन पुरुष, एक लहान मुलाचा समावेश आहे.